आलेच ते बघ गावया
खोटे मढे उचलावया
भित्री कधी नव्हतेच मी
त्या नाटक्यांना भ्यावया
मतदान मी केले खरे
सरकार माझे यावया
का घाबरे ती मासळी
पाण्यात या उतरावया
हे चाहते आले नवे
गझलेत माझ्या न्हावया
आहे सुनेत्रा रांगडी
दगडांस त्या फोडावया
त्यांनीच केले लंगडे
फुकटात कुबड्या द्यावया
वृत्त – संयुत, मात्रा १४
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/