रेनकोट या दिवाळीत मी असा निराळा घेईन रे …
काठ जरीचे नसतील त्याला काठी घुंगुर माळा रे…..
धुंवाधार पाऊस पडताना घालून तो मी मिरवेन ..
छुमछुम त्याची ऐकत ऐकत पाऊस गाणी रचेन ग …
थेंब टपोरे टपटप झरतील घुंगरातुनी झरझर रे
त्या नीरातून भूमीवर मग अंकुर रुजतील हिरवे रे …
रंगबिरंगी दीप उजळता काव्यातून मम अंतर रे ..
उजळून जाईन कणकण भू चा करण्या जंतर मंतर रे ..
झंकारत मग वीज धरेवर कडाड आसूड ओढिल रे ..
भूकंपाचा ताल धरोनी नक्षत्रे नव पडतील रे