विजयपताका फडकत राहो तशीच लंकेवरी
अता उभारू करकमलांची गुढीच लंकेवरी
जिनानुयायी खराच रावण पुराण अमुचे म्हणे
म्हणून राउळ मशीदसुद्धा नवीच लंकेवरी
खुडेन दुर्वा भल्या पहाटे जुड्या फुले वाहण्या
गणेश भक्ती तुझी दिसूदे अशीच लंकेवरी
कलीयुगाची अखेर बघण्या सरळ रचूया जिना
उभी करूया मुला-मुलींची फळीच लंकेवरी
फितवुन कोणी म्हणेल जरका तिथे रहाती भुते
करायचीना उगाच स्वारी मुळीच लंकेवरी
वृत्त – ल गा ल गा गा, ल गा ल गा गा, ल गा ल गा गा, ल गा.