दिवे अंगणी लावूया
गीत दिव्यांचे गाऊया
गाय वासरू इथे उभे
त्यांना चारा घालूया
धनतेरस ही ध्यानाची
धने गूळ जल प्राशूया
नरक चतुर्दशीस औक्षण
करून श्रमणा वंदूया
दीपावली जिन मंदिरी
भल्या पहाटे पाहूया
संध्यासमयी शुद्ध मनी
मोक्ष लक्षुमी पुजूया
फराळ वाटू प्रतिपदेस
गप्पा टप्पा मारूया
भाऊबीजेला प्रवास
बसुन विमानी गाऊया
अशी दिवाळी सौख्याची
प्रेमामध्ये न्हावूया