मनातल्या मनात गा
ऋतूंसवे भरात गा
उनाड ऊन्ह कोवळे
म्हणे फुलांस वात गा
सुरेल गीत मोकळे
सुसाट वारियात गा
नभात वीज नाचता
धुमार पावसात गा
खुमारदार सावळ्या
नशेत चिंब न्हात गा
भरून प्रीत अंतरी
टिपूर चांदण्यात गा
जगून भरभरून घे
मिळेल साथ हात गा
बनून पाखरू निळे
गुलाब ताटव्यात गा
ललाल लाल लालला
स्वरात भीज सात गा
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १२)
लगावली – लगाल/गाल/गालगा/