लिहिते गझल जिथे मी वाजे नुपूर तेथे
कोणीतरी लपोनी येते जरूर तेथे
तव नाव झाकता मी हसतोच शेर गाली
मग ओळ ओळ माझी लाजून चूर तेथे
पाऊस लेखणीच्या डोळ्यांमधून झरता
भिजवून चिंब गात्रे नाचे मयूर तेथे
शब्दांस वाकवे मी मज शब्द नाचवीती
कोणीच ना उरे मग हांजी हुजूर तेथे
तू लाख टाळशी पण मक्त्यात मीच दिसते
घन बरसतोच गाली येतोच पूर तेथे
लगावलीः गागालगा लगागा गागालगा लगागा
मात्राः २२१२ १२२ २२१२ १२२ = २४ मात्रा)
3 responses to “लिहिते गझल जिथे मी – LIHITE GAZAL JITHE MEE”
he anandkand vrutta aahe.
होय.
he anandkand vrutta aahe