घरकामाला सुट्टी घे पण नको आज तू भांडुस सखये
वडापावची गाडी आली नको पसारा मांडुस सखये
वडापाव हा जरी कालचा पाव भाजला तुपात खरपुस
खलात त्याला टाकुन वेगे नकोच रागे कांडुस सखये
तू तर माझी प्रियतम साकी खिलव वडे या रसिक जनांना
गझलांनी मी भरले प्याले नको ग त्यांना सांडुस सखये
नको टमाटे वडे फेकणे कोशिंबिर आंधळी पुरे ही
गझलांचे षटकार मारण्या शोध विटी अन दांडुस सखये
चिखलू दगडू आणि ‘सुनेत्रा’ तळा वड्यांना गोल साजऱ्या
खाण्यासाठी चवीचवीने चल बोलावू पांडुस सखये
गझल मात्रावृत्त – मात्रा ३२