अजून माझ्या निळ्या कपाटी वर्दी खाकी आहे
करी कायदा घेण्याची मम इच्छा बाकी आहे
वेग कशाला फुका वाढवू जाईन आरामात
दो पायांची माझी गाडी चौदा चाकी आहे
फिरविन लाठी वीजेसम मी कोसळण्या ढग हट्टी
कातळ काळ्या दंडी माझ्या बिल्ला वाकी आहे
अर्धा प्याला कसा भरू मी कधी न चिंता केली
भरून प्याला देण्या जवळी प्रतिभा साकी आहे
या गझलेच्या मक्त्यामध्ये नाव न लिहिणे बरवे
लखलखणारी नऊ अक्षरी नथनी नाकी आहे