नाचवीत उंच हात कोण काय बोलतात
गझल चोरुनी कुणास हाय हाय बोलतात
ये न ये न म्हणत म्हणत स्वागतास सज्ज तेच
का निरोप पण लगेच बाय बाय बोलतात
नीर उकळ उकळुनी ढगाढगात धाडतात
दूध तापवून मस्त साय साय बोलतात
लागला असेल यांस चळ जरी अता अताच
वृषभ हा असे समोर म्हैस गाय बोलतात
फालतूच कारणे सदैव कष्ट टाळण्यास
कामधाम सांगण्यास माय भाय बोलतात
वृत्त – चंचला, मात्रा २४
लगावली- गा ल गा ल/गा ल गा ल/गा ल गा ल/गा ल गा ल/