प्रत्येकाच्या रात्रीमध्ये असते कोणी वेडी
वेडीसाठी शहाण्याने अडकवलेली बेडी
बेडी कसली तो तर गजरा जाई-जुईचा
त्याच्यासाठी घालते ती वेणी तिपेडी..
प्रत्येकाच्या अंतरी असते काही वेड
असल्याअस्सल वेडाची काढाल जर छेड
इंगा दावील निसर्ग तुम्हा नका घेऊ पंगा
पाऊस म्हणतो वार्यासंगे घालीन पुन्हा दंगा…..