वेदीवरी वेश्या निजे काळास का मी दोष देऊ
निर्लज्ज आई बाप ते बाळास का मी दोष देऊ
मौनातल्या गझलेतले जे शेर बब्बर कर्मयोगी
त्यांनीच कर्मे उकरता फाळास का मी दोष देऊ
गप्पा कधी शेजेवरी सुचतात का हे सांग वेडे
बाबा बुवा कुटतात त्या टाळास का मी दोष देऊ
भट्टीतल्या सोन्यापरी तावून आत्मा झळकताना
अंगात भरल्या ज्वानिच्या जाळास का मी दोष देऊ
रागावले मौनी जरी चिंतीत असतिल ते भले जर
देहात त्यांच्या साठल्या गाळास का मी दोष देऊ
अक्षर गण वृत्त – मात्रा ३०
लगावली- गागालगा/गागालगा/गागालगा/गागालगागा /