काढुनी ऐनका मुला पाहू
घालुनी ऐनका तुला पाहू
न्यूनगंडासवे अहंगंडा
काढुनी साठल्या जला पाहू
मुक्त फुलपाखरे उडायाला
वासना फुंकुनी फुला पाहू
जाउया भटकण्या नव्या देशी
गगनचुंबी सदन व्हिला पाहू
बरसतो भूवरी कसा धो धो
सावळा मेघ तो चला पाहू
हिरवळी माजता दलदलीने
वाळवंटात काफिला पाहू
बंद तो राहिला कुणासाठी
जाहला आज तो खुला पाहू
वृत्त -लज्जिता, मात्रा -१७
लगावली – गा ल गा/गा ल गा/ल गा गा गा