शुभ्र कुंतलात सांग गुंतणे अता कशास
होउया तरंगरूप बिंब सांगते जलास
आस संपताच भास दूर जाय क्षितिजपार
हारजीत कागदीच जिंकले कुणी कुणास?
भांडण्यास भेटलो उन्हामधील चांदण्यात
तीच वेळ खूप मस्त वाटली जरी न खास
भावभोर लोचनात सांजस्वप्न दाटताच
देतसे गुलाबपुष्प कंटकासही सुवास
तू तसाच मी अशीच भेटण्यास ये निवांत
रंगुदेत मैफिलीत माझिया-तुझ्या घरास
वृत्त – चंचला, मात्र २४
लगावली – गा ल गा ल/ गा ल गा ल/ गा ल गा ल/ गा ल गा ल/