टोकावरी जाऊ नको
गेल्यावरी नाचू नको
थांबून तू न्याहाळ ते
टोकात पण गुंतू नको
करशील जेव्हा सामना
नजरेस तू टाळू नको
आरास तू केली जरी
ते मुखवटे घालू नको
ओढावया नाकास तव
हातामधे देऊ नको
जे पाप पुन्हा उगवते
जाळून ये गाडू नको
कमरेस जे गुंडाळले
डोक्यास गुंडाळू नको
वृत्त – संयुत, मात्रा १४
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/