निळे पारवे गडद दाटले धुके उपवनावरी
डोंगरमाथ्यावरून आल्या रवीकिरणांच्या सरी
घुसळुन घुसळुन साय धुक्याची आले वर लोणी
लोण्यामधुनी दवबिंदूंचे घळघळले पाणी
कढवुन लोणी पानोपानी तूप गाळले छान
संधीकाली सांजवातीने उजळुन गेले रान
धवल चंद्रमा प्राचीवरती झरे चांदणे पान
प्राशुन त्याला चकोर गाई स्वातंत्र्याचे गान