कुणी टाकिला तळ्यात मासा माझ्यासाठी
कुणी बनविला त्याचा फासा माझ्यासाठी
घन फाश्यावर कोणी लिहिले कुणी वाचले
तोच खरा पण प्रियतम खासा माझ्यासाठी
“रे ग म प ध नी” चा मज आला सांगावा रे
तरी निमंत्रण धाडेना “सा” माझ्यासाठी
धुवेन पात्रे निर्झरातल्या जलात निर्मळ
त्याआधी ती तुम्हीच घासा माझ्यासाठी
घरांस वासे किती लाविले नकाच मोजू
काढुन भरभर तयांस तासा माझ्यासाठी
वाश्यांना पोखरे वाळवी…त्यातुनही पण
जो सच्चा तो टिकेल वासा माझ्यासाठी
उंच हवेलीचे छत मजबुत होण्यासाठी
काळा शिसवी तू ने वासा माझ्यासाठी
गझल मात्रावृत्त (मात्रा २४)