सीमेचे उल्लंघन केल्यानंतर बोलू
पुन्हा वेगळे आल्यावर प्रत्यंतर बोलू
भटकुन भटकुन मन थकल्यावर ध्यानाग्नीतुन
हरेक ओठांवर हलतो तो मंतर बोलू
आंतरजाली फिरती शोधक नित्य इंजिने
गूगलवरच्या इंजिनांस त्या व्यंतर बोलू
देव पाहण्या नकाच काटू अंतर बिंतर
नीतळ आत्म्यालाच स्वतःच्या अंतर बोलू
विचार मंथन करण्याचा अन बोलायाचा
मला सुनेत्रा आहे ध्यास निरंतर बोलू