नवी खास वाटे गुणाची सुखदा
खरा भाव जपते ऋणाची सुखदा
किती सरळ आहे सलिलता मृदुता
घडी मस्त घाले खणाची सुखदा
म्हणे बाप भाऊ जणू फुल मधुरा
म्हणुन वाट लावे तणांची सुखदा
जळूसारखी जी घराला चिकटे
तिला जाळ लावी पणाची सुखदा
पुरे माज मस्ती उतरणे जरुरी
खडा घाव घाली घणाची सुखदा
लगावली – लगागा/ लगागा/ लगागा/ललगा/
मात्रा- १९