धुतल्या तांदूळासम येथे सापडलेका कोण तुला
पुरे जाहले अता तोलणे तुला सांगते जोडतुला
स्वर्णतुलेची वजने मापे गझलेमधले शिरोमणी
त्यांचे प्याले सांडायाची का वाटे रे ओढ तुला
डोळ्यावरती बांधुन पट्टी न्यायदेवता उभी इथे
न्यायाधिश तू न्याय खरा दे शोभत नाही मौन तुला
स्वार्थासाठी कोणी अपुल्या बळी देतसे जीवाचा
शरीर पुद्गल सिद्ध कराया दुभंगेल ही सोनतुला
नजर असावी सौंदर्यावर नवसृष्टीच्या भरलेल्या
दुःख उकरुनी काढायाची जडली मनुजा खोड तुला
गझल मात्रावृत्त (मात्रा ३०)