होईलच स्थित्यंतर आता
गोळा केले कंकर आता
नकोच काढू अत्तर आता
फूल जाहले पत्थर आता
म्हणता बुळ्ळ्या मंतर आता
यमी कापते थरथर आता
कर तू उघडे अंतर आता
त्याविन ना गत्यंतर आता
फोड मुठीने फत्तर आता
उपाय सुचतिल सत्तर आता
पत्थरात का देव राहतो
प्रश्न नको दे उत्तर आता
नहीच रे मै स्वरुपसुंदरी
कुरुपच म्हण बेहत्तर आता