निर्झराचा नाद आहे
ही जलाची साद आहे
उमटते जी कागदावर
ती प्रियेची दाद आहे
प्राशुनी मी काव्यगंधा
चाखला तव स्वाद आहे
पूर्ण जाणे आत्मियाला
तो खरा स्याद्वाद आहे
मैत्र जडता पाखरांशी
गूज अन संवाद आहे
नासवीले दूध त्याने
त्यास तो मोताद आहे
मायभूचा करुन सौदा
जाहला बरबाद आहे
रंगती गप्पा स्मृतींच्या
माजतो तो वाद आहे
उघड ते नैवैद्य खाती
लपविले ते खाद आहे
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १४)
लगावली – गालगागा/गालगागा/