डोईवरती पंखा लाल
जास्वंदीचे जणु ते गाल
किनार काळी पंखाकार
फांदीवरती पक्षी बाल
पाने गाती वसंत गान
झुळझुळ वारा देतो ताल
सांग कोणता गाऊ राग
उजळ उजळ बघ माझे भाल
घेता खग कंठातुन तान
अवखळ निर्झर बदले चाल
विहगा गगनी घेऊन झेप
लूट घनातिल मौक्तिक माल
मेंदी रंगी स्वप्न निळे
बघत रहा पांघरुन शाल
गझल मात्रावृत्त (मात्रा १५)