सत्य प्रिय मी मला प्रिय मी
सत्य प्रिय मी झुला प्रिय मी
कृष्ण घन लेखणीत झरे
सत्य प्रिय मी कला प्रिय मी
शब्द शर लक्ष्यभेद करी
सत्य प्रिय मी बला प्रिय मी
न्याय कर आंधळ्या बरवा
सत्य प्रिय मी तुला प्रिय मी
सांग तिज ऐकण्या गझला
सत्य प्रिय मी जिला प्रिय मी
झाड मज बोलले गुज हे
सत्य प्रिय मी फुला प्रिय मी
ताल लय शारदा स्वरदा
सत्य प्रिय मी तिला प्रिय मी
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १४)