ठाम निश्चयी दृढतम श्रद्धा
कशास पाळू अंधश्रद्धा
दुजांवर ठेवूनी पाळत
स्वतःसाठी कुणी खोदे खंदक
बिनबुडाचे भांडे चुलीवर
कशास नाटक व्यर्थ आगीवर
निर्जरेस मज कर्मे माझी
पराकडून ना घेते आंदण
स्वार्थी लंपट मित्र नव्हे ते
ते तर शत्रू तुटते बंधन
लांछन बिंछंन नाद कशाला
मम कर्मांचा मला हवाला
बदफैल्यांचा माज पोसुनी
म्हणे सोवळा स्वतःस कोणी
सोबत प्रतिभा प्रतिमा प्रतीके
धर्माने मम तनमन पावन