In this Ghazal the poetess asks a flower or a kid to demand everything it wants. This Ghazal is written in 26 matras.
हवेहवेसे, जे जे वाटे, ते ते माग फुला ;
गोळा-बेरिज, हवी कशाला, पूर्णच भाग फुला.
नकोच गुणणे, आणि मिळवणे, नको वजाबाकी;
भागुन भागुन, मिळेल उत्तर, बाकी त्याग फुला.
सखे सोबती, घरकुल दे मज, हिंदोळा पण दे;
दिलेस अंगण, फुलावया जर, होइन बाग फुला.
निरांजनातिल, सांजवात तू, तेजोमय कलिका;
तण पापांचे, जाळाया पण, होशिल आग फुला.
वसुंधरेवर, निशिगंधाचा, परिमल होउनिया;
शीतल सुंदर, चंद्रावरचे, पळवू डाग फुला.
अनुरागाचे, शस्त्र लालिमा, कवितेच्या गाली;
रंग नेत्रि मम, भरून श्यामल, गाइन राग फुला.