लिहावयाला भिऊ कशाला
प्रश्नचिन्ह मग लिहू कशाला
लिहिणे करते मुक्त मनाला
तर दुःखाने झरू कशाला
अर्थ काढते सदैव हितकर
शब्दांमध्ये फसू कशाला
हृदय बोलते घडले सुंदर
कुरूप भू ला म्हणू कशाला
अंधश्रद्ध ही नव्हे “सुनेत्रा”
श्रद्धेला मी डसू कशाला
गझल मात्रावृत्त (मात्रा १६)