नजर भिडविण्या मम नजरेला हिम्मत लागे
हात लावण्या मम कमरेला हिम्मत लागे
हवीच तुज जर माझी मैत्री बदल स्वतःला
धडक द्यावया मम टकरेला हिम्मत लागे
मार हव्या तू चकरा जितक्या मारायाच्या
मोल द्यावया हर चकरेला हिम्मत लागे
नकोस नखरा फक्त करू तू सांभाळ तया
सांभाळाया त्या नखरेला हिम्मत लागे
भाषेमध्ये मिसळुन भाषा एक कराया
रूळ म्हणायाला पटरेला हिम्मत लागे
मात्रावृत्त – २४ मात्रा