त्यागाची इच्छा झाली हे दूध उतू गेले
हृदयाला आली भरती हे भाव उतू गेले
बादली बिनबुडाची ही भरणार कसे पाणी
पापणीत भरता पाणी हे शब्द उतू गेले
रचल्यास किती तू गोष्टी टाकून फोडणीला
देताच अर्थ मी त्यांना हे रंग उतू गेले
वासनेस येता भरते आकाश रडे स्फुंदे
टरकावुन सोंगे ढोंगे हे तेज उतू गेले
वासना कामना इच्छा काहीही म्हण त्यांना
ऐन्यात पसरता किरणे हे बाष्प उतू गेले
ओतून दह्याच्या पात्री हलकेच साय साखर
घुसळता ताक मी वेगे हे प्रेम उतू गेले
लपविशी कशाला भांडे ताकास जाऊनिया
ताकाने भरता भांडे हे ढंग उतू गेले
शिकविणे अडाण्या हाती देऊन करंटे बनलो
परवाना येता हाती हे वेग उतू गेले
गद्यात बांधल्या गझला बेताल ललित लिहुनी
गुणगुणुनी गाणी गाता हे ताल उतू गेले