होम्बुज पद्मावती अंबिके
पार्श्वयक्षि गुणखणी अंबिके
धरणेंद्राची सखी प्रिया तू
सगुण मूर्त साजिरी अंबिके
भवसागर हा तरून जाण्या
दिव्यदृष्टि दे मती अंबिके
वीज भासतेस तू कांचनी
लखलखती भूतली अंबिके
मुखचंद्रासम तुझ्या उमलले
कमलपुष्प काननी अंबिके
गझल मात्रावृत्त (मात्रा १६)