कुर्निसात माझा आता शुद्ध आत्मियाला देवा
कुणापुढे वाकू का मी नाटकात यांच्या त्यांच्या
कोणत्या पदाला सांगा आज काल पुसते कोणी
माझे घर माझी नाती जपत जाय माझी प्रीती
भाव लोळे काव्यरंगी माखुनी त्या घेय बुद्धी
सुगंधाला आर्जवाच्या श्वास पुरवी भिजुन माती
वेड आहे शुभत्वाचे म्हणून लिहिते रात्रं दिन
जागते मी अर्थ देण्या एक एकेका शब्दास
लेखणीची साथ आहे ग्रंथ सारे सोबतीला
सुनेत्राची गाडी जाय प्रेम जिथे मुक्कामाला