हात उगारून जरी घाम कुणी दाविला
हास बरे गोड जसे दाम कुणी दाविला
आम्रतळी गीत खुजे त्रस्त करी जेधवा
उंच उभा वृक्ष नभी पाम कुणी दाविला
भाळ शिरी नित्य कधी शूळ उठे तेधवा
भरुन कुपी जर्द धमक बाम कुणी दाविला
दाम तयां खूप मिळे कष्ट करोनीच रे
दाम मिळायास परी काम कुणी दाविला
द्वाड मुला बोल अता मौन तुझे त्यागुनी
मार्ग फुलां सांग बरे वाम कुणी दाविला
आत्मरुपी देव वसे बोध असा देउनी
तीर्थस्थळी ईश खुदा राम कुणी दाविला
जाण घना झिंग सुनेत्रास गझलची खरी
झिंग पुन्हा म्हणत निळा जाम कुणी दाविला
गझल – अक्षरगणवृत्त (मात्रा २३)
लगावली – गाललगा/गाललगा/गाललगा/गालगा/