कर्माला नूतन रोखू तू बोट सखीचे धरना
आत्माच तुझा हा सुंदर आत्म्यात मला तू बघना
करवंदी डोळ्यांमधले बघ काजळ उतरे गाली
मिटलेल्या पापण काठी येऊन प्रियतमा निजना
काठावर मौन तळ्याच्या जललहरी नाचत येती
पाण्यात चांदणे झरते गझलेवर कविता करना
हृदयाच्या खोल तळाशी तव दिसते हसरी प्रतिमा
तू झुळुक सुगंधी बनुनी अतातरी झुळझुळना
रिमझिमत्या आठवणींचा पाऊस बरसतो जेव्हा
उघडून मनाची खिडकी मी तुला शोधते सजना
गझलेतच रमता कविता कवितेतच गझल रमावी
हे नाते रम्य खरोखर या नात्यावर तू तरना
मी जरी सुनेत्रा आहे तुजसाठी नेत्रा झाले
गावुया प्रीतिचे गाणे चांदण्यात फिरण्या चलना