कुंडलिया मी म्हणू तुला की कुंडलिनी बोल
चाँद पुरा मी म्हणू तुला की ‘मखर झणी’ बोल
नेत्र तुझे चंचले दुधारी कापत जातात
नीरज त्यांना कसे म्हणू मी मंगळिनी बोल
मंगळिशी तू सदा मला का चेपविण्या भीड
मीच बरा सापडे दिवाना ‘कळसवणी’ बोल
अंग तुझे हे फिकेफिकेसे गारठुनी जाय
सांगतसे मी कथा फुलांची मुग्ध शनी बोल
रंग खरा पाहण्या तुझा मी आज इथे मौन
सांग तुला आवडे ‘सुनेत्रा’ आठवणी बोल
व्यर्थ तुझे चोचले चहाड्या सोड जुनी गाठ
आवरुनी तू अनेक ‘मात्रा’ सावरुनी बोल
‘गाललगा’ गालगा लगागा गाललगा गाल
‘लगावली’ ही जणू ‘गझाला’ तोल मनी बोल