एक करंजी खूपच रुसली
कढईमध्ये बघ धडपडली
चिडून कढई तिथून उठली
चुलीवरी अन जाऊन बसली
कढई मग तेलाने भरली
फूंक मारिता चूल पेटली
तेलालाही उकळी फुटली
ताप तापुनी उकळ उकळली
शुभ्र करंजी तयात फुगली
बघून झारा खुदकन हसली
थाळीमधल्या जळात पडली
मासोळीसम त्यात पोहली
बाळोबाने तिला उचलली
चोखुन चावुन गिळुन टाकली