हाय! मी वेडी किती रे रंगले त्या मृगजळी
चुंबिले प्रतिमेस भ्रामक दंगले त्या मृगजळी
शिल्प कोणा प्रेमिकांचे घडवितो शिल्पी कुणी
बनविता कैदी तयाला भंगले त्या मृगजळी
बेरकी होत्याच वृत्ती वृत्त होते नेटके
अर्थ पण फसवे परंतू संपले त्या मृगजळी
यक्षही नावेत होते जादुई खुर्च्या तिथे
चिकटले खुर्च्यांस जे जे गंडले त्या मृगजळी
गझल सच्ची घेउनी मी लागता काठास या
युद्ध नकली भावनांचे जुंपले त्या मृगजळी
वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा.