होतसे मी क्रुद्ध आता
जाहले बघ वृद्ध आता
शब्द पुद्गल जाणते मी
पेटवीती युद्ध आता
शब्द आतुर बोलण्या पण
कंठ का अवरुद्ध आता
रंगले मन रंग उधळुन
कोण येथे शुद्ध आता
नांदता चित्तात शांती
भासते मी बुद्ध आता
वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा.
होतसे मी क्रुद्ध आता
जाहले बघ वृद्ध आता
शब्द पुद्गल जाणते मी
पेटवीती युद्ध आता
शब्द आतुर बोलण्या पण
कंठ का अवरुद्ध आता
रंगले मन रंग उधळुन
कोण येथे शुद्ध आता
नांदता चित्तात शांती
भासते मी बुद्ध आता
वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा.