जमीन सुंदर – JAMEEN SUNDAR


गझलेमध्ये, शेर असावे, किमान तरिहो पाच;
रदीफ नसला, तरी चालते, काफिया पण हवाच.

सूर ताल अन, लय सांभाळत, गझलीयत येताच;
वृत्त असूदे, लाख देखणे, वृत्तीचा का काच?

अलामतीला, जो जपतो तो, तोच काफिया खास;
पकडाया लय, करून गुणगुण, करा मनातच नाच.

मतला म्हणजे, जमीन सुंदर, पहिला बब्बर शेर;
फुलवाया गण, अक्षर मात्रा, कधी न घेई, लाच.

मक्त्यामध्ये, नाव गुंफता, गझल न वाटे भास;
अर्थ जाणण्या, तिजला रसिका, हृदयापासुन वाच.

लालित्याने, भरून वाहे, कवितेचे माहेर;
सासुरवाशिण, गझल बावरी, करू नका तिज जाच.

जेथे आर्जव, तिथेच राहिन, म्हणते निर्झर गीत;
निर्मल करण्या, जल काव्यातिल, गेला काळ बराच.

साहित्याचा, श्वास चालतो, मुक्त कराया प्राण;
म्हणून कपटी, प्रवृत्तीवर, आणू सत्वर टाच.

नेत्र  ‘सुनेत्रा’, शांत जलाशय, गहिरे नीतळ नीर;
खरेखुरे नय बिंब पाहण्या, नको दर्पणी काच.

मात्रावृत्त  (८+८+११=२७ मात्रा)


2 responses to “जमीन सुंदर – JAMEEN SUNDAR”

  1. गझल पुस्तक विकत घेणे हा उद्देश . दिडधा दिडधा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.