साद घालण्या शंख कशाला
मनात धरण्या अंक कशाला
स्पर्श कराया निळ्या नभाला
चुंब फुलांना डंख कशाला
रांध चुलीवर अन्न चवीचे
फूड हवे तुज जंक कशाला
लवचिक होण्या ताठ अंगुली
गिरव अक्षरे टंक कशाला
संपव कामे मग सुट्टी घे
उगाच दांडी बंक कशाला
पुण्य कमवुनी रावच व्हावे
फुका व्हायचे रंक कशाला
बनेन कोकिळ मधुर गावया
नाटक करण्या कंक कशाला
स्वच्छ जलाने हृदय भरूदे
फुलण्या कमळे पंक कशाला
आगमचक्षू होच ‘सुनेत्रा’
उडावयाला पंख कशाला
मात्रावृत्त(८+८=१६ मात्रा)
2 responses to “पंक कशाला – PANKA KASHAALAA”
खूप मस्त
dil khush kar diya