म्हण गाणे वा पाढे तू
दूध वीक पण गाढे तू
म्हणता साडे माडे तू
‘मी’ला जेवण वाढे तू
जरा कुठे बघ बरे घडे
भांडण उकरुन काढे तू
बील द्यावया खरे खरे
अचुक मोजरे खाडे तू
मनात मीपण ताठ जरी
अंगण वाकुन झाडे तू
हाती नाही माध्यम पण
क्षणात सारे ताडे तू
अर्धे पक्के चावुन खा
पेरू दाढे दाढे तू
हुरहुरता मन सांजेला
निरोप सुंदर धाडे तू
गूळ लावण्या सखी तुला
बोले लाडे लाडे तू
गाइ-गुरांना खाण्याला
टाक उसाचे वाडे तू
शुद्ध गोमट्या बीजाला
भूमीमध्ये गाडे तू
अंकुर येण्या भुईवरी
नीर ढगातुन पाडे तू
धूळ झटकुनी मेजावर
ठेव वहीची बाडे तू
मात्रावृत्त (८+६=१४ मात्रा)