शुन्यात पाहतो मी
पुण्यात डुम्बतो मी
प्राचीवरी उगवुनी
शुक्रास शोधतो मी
सायीस मस्त घुसळुन
लोण्यास काढतो मी
अश्रूतल्या मिठाला
नक्कीच जागतो मी
तव भावनेस सप्पग
लवणात घोळतो मी
सलतो तुला सदा त्या
काट्यास काढतो मी
सारे फितूर वारे
पंख्यात डांबतो मी
होऊन कृष्ण काळा
गाईंस राखतो मी
सांजेस केशरीया
रंगात माखतो मी
वृत्त – गा गा ल गा, ल गा गा.