माय मऱ्हाटी जिनवाणीसम देवा आम्हाला
इंग्लिश देते नात तिचीरे सेवा आम्हाला
कन्नड हिंदी गुजराथीने मऱ्हाटीस जपले
तमिळ तेलगू उर्दू भरवी मेवा आम्हाला
बंगालीचा पावा मंजुळ कटुता तुळु विसरे
मल्याळीही संगे म्हणते जेवा आम्हाला
प्रगती पाहुन गुणीजनांची मुनीवर आनंदी
कधी न वाटो गुणीजनांचा हेवा आम्हाला
रत्नत्रय हे हृदयी मिरवू खरी संपदाही
पुण्यभूमिवर हाच मिळाला ठेवा आम्हाला
मात्रावृत्त – ८+८+१०=२६मात्रा