सावळी सावळी भुई नाचे
त्यावरी वल्लरी जुई नाचे
पाच बोटांवरी बसोनीया
सान कैरीतली कुई नाचे
वस्त्र आहे जरी भरड त्यावर
होत मागे पुढे सुई नाचे
मेघना दामिनी कडाडे अन
मस्त तो मोर थुइ थुई नाचे
वारियाने उडे झुले धावे
स्वैर ती रानची रुई नाचे
वृत्त -लज्जिता, मात्रा -१७
लगावली – गा ल गा/गा ल गा/ल गा गा गा