तृप्त झाली ही धरा बघ चांदण्यांच्या पावसाने
रातराणीच्या फुलांनी भरून गेली सौरभाने
अंबरातिल मेघनेसह तारकांनी नृत्य केले
दाविल्या त्यांच्या अदा अन बिंब सुंदर आरशाने
मंदिरातील दीपज्योती धूप दरवळ कर्पुराचा
अंगणी मृदगंध लहरे शिंपलेल्या पावसाने
शुभ्र कलिका मोगऱ्याच्या वेल जाई उंच गगनी
आसमंती सूर झरती पंडितांच्या गायनाने
देखण्या नक्षत्र बाला मुग्धही आकाशगंगा
मी सुनेत्रा शब्द वेचे सांडले जे आश्विनाने
वृत्त -व्योमगंगा, मात्रा २८
लगावली – गा ल गा गा/ गा ल गा गा /गा ल गा गा /गा ल गा गा