चंद्रावरी हे पोचले
ते मंगळाशी भांडले
असुनी कुरूप नि वेंधळी
मजलाच त्यांनी निवडले
येताच त्यांच्या आड तो
सूर्यास त्यांनी रोखले
नक्षत्र ताऱ्यांना कसे
भंडावुनी मी सोडले
होते किती मतिमंद ते
वातात कोणी बरळले
गर्विष्ठ मी आहे जरी
बारा कसे ना वाजले
सांगा सुनेत्राला खरे
म्हणताच का ते कोपले
वृत्त – संयुत, मात्रा १४
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/