आवाज माझा आतला
काट्यावरी मी तोलला
तो कोण होता पाठिशी
सांभाळ मजला बोलला
मौनात होता आरसा
मी फोडता पण वाजला
रानात धेनू हंबरे
ऐकून स्वर मुरलीतला
येताच भरती सागरा
तो लाट बनुनी गाजला
सोडून होडी हातची
पाण्यात तो झेपावला
मम भावना भवनाशिनी
वाचून तोही थांबला
वृत्त – संयुत, मात्रा १४
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/