मी काय होते काय झाले
भलतीच हाय नि फाय झाले
सांभाळण्या ही गझल माझी
मी भांडणारी माय झाले
होते जरी मी देवमाता
का मारकूटी गाय झाले
मी मस्तकी होते जरी तव
तुज चालवाया पाय झाले
मी दुग्धगंगा वाहणारी
तापून हलके साय झाले
वृत्त – अक्षरगण वृत्त, मात्रा १६
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा गा