संपेल आता जाळणे
अन प्रीत सुंदर टाळणे
ढग डोंगरी पाणी झरे
आणू कशाला गाळणे
रंगून सुकले रंगही
आता पुरे हे वाळणे
येता समीप मधुघटिका
शंकेस का या पाळणे
आनंद मोदे विहरतो
डोळे नको मग गाळणे
भार्या खरी तव सुंदरी
परकीवरी का भाळणे
वृत्त – संयुत, मात्रा १४
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/