हे पोलके झाले जुने
टाकून देना साजणे
आणेन चोळी जांभळी
कशिदा तुझा तू रेखणे
ये राहण्या माझ्या घरी
हिंडू फिरू पाहू पुणे
भरवूत मैफल गझलची
येतील दर्दी पाहुणे
आता सुनेत्रा बासना
गझलेस पाणी पाजणे
वृत्त – संयुत, मात्रा १४
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/