पाण्यावरी, नाचू कशी, तू सांग मज मंदाकिनी!
आहे किती हे खोल जल! दे थांग मज मंदाकिनी !!
मज आवडे धावावया, खेळावया नीरात या;
बाळापरी म्हणतात यावर रांग मज मंदाकिनी…
गालावरी भुवईवरी हे तीळ गोंडस साजिरे;
आहेत हे सुंदर जरी! दे वांग मज मंदाकिनी..
टांग्यातुनी रिक्षातुनी, जातात हे! फिरतात ते!
का रोज ते, देती अशी पण टांग मज मंदाकिनी?
चर्चा करू भांडू रडू, झोंबू पडू झोपू घरी!
झोपेतुनी उठवावया, हो कोंबडा! दे बांग मज मंदाकिनी..
ये सोडवाया सत्वरी, यांच्यातुनी आतातरी;
डसतील अन करतील हे! विकलांग मज मंदाकिनी!!
डोईवरी घनदाट काळे केस कुरळे शोभती..
जळतात जळके.. पाड म्हणती भांग मज मंदाकिनी…
वृत्त – मंदाकिनी, मात्रा २८
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/ गा गा ल गा/ गा गा ल गा.