सांगूनही मी लाखदा तू ऐकले नाहीच रे
आतातरी तू ऐकना लाभेल तुज शांतीच रे
कोण कसे बोलायचे त्यांना तसे बोलूचदे
याच्याविना घडणारना आता खरी क्रांतीच रे
मी लेखणीला परजते शब्दांस या उजळावया
आहे दुधारी धार हिजला लख्ख ही पातीच रे
वागायचे ज्याला बरे वागेल तो तैसे भले
सांभाळण्या घरकूल हे आता हवी बाईच रे
रक्तातल्या रंगामधे बदनाम करता का फुलां
दावावया रंगास धवला सांडते शाईच रे
वृत्त – मंदाकिनी, मात्रा २८
लगावली – गा गा ल गा/गा गा ल गा/गा गा ल गा/गा गा ल गा.